Zeeshan Siddique : काँग्रेसचा आणखी एक आमदार फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आज (19 ऑगस्ट) मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी बॅनर्स लावल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. वांद्रे मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर झळकल्याने वडील बाबा सिद्दिकी यांच्या मार्गाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये झिशान सिद्दीकी प्रवेश करणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. 


राष्ट्रवादीचे नेत्यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले 


गेल्या काही दिवसांपासून आमदार झिशान सिद्दीकी पक्ष सोडणार असल्याचे चर्चा होती. ही चर्चा सुरू असताना जहाज वांद्रे पूर्व मध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेत्यांच्या स्वागताचे डिजिटल सिद्दिकी यांच्याकडून बॅनर लावण्यात आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत सात ते आठ आमदारांची मते फुटल्यानतंर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्या आमदारांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. यामध्ये झिशान सिद्दिकी यांचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा आहे. 


बाबा सिद्दीकींचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश


दुसरीकडे, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर झीशान सिद्दिकी यांची काँग्रेस युवा शाखेच्या मुंबई विभागाचा अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. झीशान यांनी काँग्रेसच्या निर्णयावर कोणतीही अधिकृत सूचना न देता पदावरून हटवण्यात आल्याचा आरोप केला होता.  झीशान सिद्दीकी यांच्या जागी युवा संघटनेच्या मुंबई युनिटच्या अध्यक्षपदासाठी अखिलेश यादव यांच्या नावाची घोषणा केली. याआधी ते शहरातील एनएसयूआय या पक्षाची विद्यार्थी शाखा प्रमुख होते. 


दुसरीकडे, काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) आणि जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.  त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या