Baba Siddique and Zeeshan Siddique :  सध्या माझा कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. मी काँग्रेस (Congress) पक्षासोबत आहे. मी स्वत:बद्दल सांगू शकतो वडिलांचं (बाबा सिद्दीकी) (Baba Siddique) तुम्ही त्यांना विचारा, असे स्पष्टीकरण आमदार  झिशान सिद्दकी  (Zeeshan Siddique)  यांनी दिले आहे. सिद्दकी पिता-पुत्र  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP Ajit Pawar) गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त गुरुवारी आलं होतं. यावर झिशान सिद्दकी यांनी भूमिका स्पष्ट करत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं सांगितलं. यावेळी झिशान सिद्दकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुकही केले. त्यांनी मला नेहमीच मदत केली, यापुढेही ते मला मदत करतील, असेही ते म्हणाले. 


इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही. मी सध्या काँग्रेस पक्षासोबत आहे.  जर काही घडत असेल तर नक्कीच सांगेन. वडिलांबाबत मला माहित नाही. याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, असे झिशान सिद्दकी यांनी सांगितलं. सकाळपासून मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं विचारणा करण्यात येतेय. याचं मला आश्चर्य वाटतेय. काँग्रेस सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही, असेही झिशान सिद्दकी म्हणाले.


अजित पवारांबद्दल काय म्हणाले झिशान सिद्दकी ?


अजित पवार यांच्यासोबत आमचे कौटंबिक नाते आहे. अनेक वर्षांपासून आमचे चांगले संबंध आहेत. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सोबत होतो तेव्हा अजितदादांनी साथ दिली होती.  मला निधी मिळत नव्हता त्यावेळी त्यांनी साथ दिली होती. त्यांच्यासोबत नेहमीच भेट होते. ते नेहमीच मदत करतात. यापुढेही ते मला मदत करतील, असे झिशान सिद्दकी म्हणाले. 


झिशान सिद्दीकी कोण आहेत?


झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 


वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique) आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.  मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती.


आणखी वाचा :


Congress : मोठी बातमी! मुंबई काँग्रेसला धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार