मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री 2 निवासस्थानाविषयी गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दोनच्या व्यवहाराची चौकशी करा, अशी मागणी संजय निरुपम यांनी केलीय.


संजय निरुपम यांच्या आरोपानुसार, वांद्रे येथील कलानगरमध्ये मातोश्री दोनच्या जागेची खरेदी ठाकरे परिवारानं राजभूषण दिक्षीत यांच्याकडून केली होती. राजभूषण दिक्षीत यांची ईडी चौकशी सध्या सुरु आहे. त्यांच्यावर करोडोंच्या मनी लॉड्रींगचा आरोप आहे. त्यांच्यावर चार्जशिट देखील दखल करण्यात आली आहे.

अश्या व्यक्तीकडून मातोश्री 2 ची खरेदी ऑक्टोबर 2016 मध्ये केवळ 5.80 कोटींमध्ये झाली. मात्र, या जागेचं बाजारमूल्य कैकपट अधीक आहे.


10 हजार स्केवर फुटाची ही जमीन राजभूषण दिक्षीत, जगभूण दिक्षीत यांच्या प्लैटिनम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती.


सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय : उदय सामंत


संजय निरुपम म्हणतात की, "मातोश्री दोनच्या डील बाबतही चौकशी व्हायला हवी. या डीलमध्ये काही रोख रकमेचे व्यवहार झालेत का? हे तपासायला हवेत.


शिवसेनेचं निरुपमांच्या आरोपावर काय उत्तर


या आरोपांवर शिवसेनेनं संजय निरुपम यांच्या आरोपाकडे लक्ष देण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे काय आहेत याची माहिती सर्व महाराष्ट्राला आहे. त्यामुळे याकडे लक्ष न देलेलं बरं अशी प्रतिक्रीया दिली आहे.


कसं आहे मातोश्री 2




  • कलानगर येथील मातोश्री या निवासस्थानाच्या समोरील बाजूस मातोश्री 2 या नव्या निवासस्थानाची वास्तू आहे.

  • कलानगर मधील मातोश्री निवासस्थान बाळासाहेब ठाकरेंनी घेतले होते. मातोश्री 2 ची जागा कलाकार कटिंनहेरी हेबर यांच्या नावावर होती.

  • त्यानंतर हेबर यांच्या मुलांनी ही जागा राजभूषण आणि जगभूषण यांच्या प्लॅटिनम कंपनीला विकली.

  • उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील ही जागा विकत घेतली.

  • या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत. त्यातील सर्व फ्लॅट ट्रिप्लेक्स असून प्रत्येक फ्लॅटमध्ये पाच बेडरूम आणि एक स्टडी रूम आहे.

  • एकीकडे महाविकास आघाडीत सेना-काँग्रेसमधील संबंध ताणले जात असताना संजय निरुपम यांनी मातोश्री 2 बद्दद उभ्या केलेल्या संशयानं इथुन पुढे हे संबंध कदाचित आणखिनच तणावाचे होऊ शकतील.


UNIVERSITY EXAMS | सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय - उदय सामंत