मुंबई : लोअर परळ पुलावरील गर्डरचं काम विक्रमी वेळात पूर्ण झालं आहे. थोड्याच वेळात इथून पहिली लोकल सुटेल. काही वेळापूर्वी एक्पसप्रेस रद्द झाली आहे. रात्री साडे दहा वाजल्यापासून याठिकाणी काम सुरु होतं. त्यामुळे आज सकाळी 9 पर्यंत लोकलची ये-जा बंद राहणार होती. मात्र त्याआधीच काम पूर्ण झाल्यानं लोकल लवकरच सुरु होणार आहे. लोअर परळ स्थानकाजवळील पूल गंजल्याचं पाहणीत लक्षात आल्यानं पूल तोडून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.


लोअर परळ पुलावरील गर्डर काढण्याचं काम वेळेआधीच पूर्ण झालं आहे. त्यामुळे परळ स्थानकावरुन 9 वाजल्यापासून लोकल धावण्यास सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी लोअर परळवरुन अवंतिका एक्स्प्रेस रवाना झाली आहे.


काल रात्री 10 वाजल्यापासूनच पूलाचं गर्डर टाकण्याचं काम सुरु होतं. त्यासाठी पश्चिम रेल्वेवर आज सकाळी 9 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता.  दरम्यान सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांचे हाल होऊ नयेत यासाठी बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

लोअर परळच्या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात आला होता. अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाकडील पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील 455 पुलांचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. लोअर परळ स्थानकाजवळील पूल (डिलाईल पूल) गंजल्याचे स्पष्ट झाल्याने आयआयटीसह रेल्वेच्या संयुक्त समितीने पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्ती काम हाती घेतले आहे.

रात्री साडे दहा वाजल्यापासून याठिकाणी काम सुरु करत 40 टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने  उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात आले.