मुंबई: शिवसेनेचे बंडखोर आणि हकालपट्टी केलेले विभागप्रमुख सुधीर मोरेंविरोधात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. भारती बावदाने यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सुधीर मोरेंकडून जीविताला धोका असल्याची तक्रार बावधाने यांनी केली आहे.


मतदारांना दमदाटी करून आणि अर्वाच्च भाषेत वापर करून प्रचारात अडथळा आणला जात असल्याचाही आरोप डॉ. भारती बावदाने यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आहे.

दुसरीकडे शिवसेनेतले बंडखोर सुधीर मोरेंनी आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, युती तोडून स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेच बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे.

वॉर्ड क्र. 123 मधून उमेदवारीसाठी माजी नगरसेवक सुधीर मोरे हे त्यांच्या भावाच्या पत्नी स्नेहल सुनिल मोरेंसाठी आग्रही होते. मात्र त्या जागेसाठी भारती बावदाने यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे स्नेहल मोरे यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे.

संबंधित बातम्या:

मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधवांच्या संपत्तीत 5 वर्षात 25 पटींनी वाढ

सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द

पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी

मुंबईतील शिवसेना नगरसेविकेला लाचखोरीप्रकरणी ACB कोठडी