भोईवाडा कोर्टात जजसमोर आरोपींवर चाकूहल्ला
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2017 02:25 PM (IST)
न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला.
मुंबई : मुंबईतील भोईवाडा कोर्टात तक्रारदाराने आरोपींवर चाकू हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला. मारहाणीच्या प्रकरणात तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. ज्यावेळी आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यावेळी तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने तीनपैकी दोन आरोपींवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.