मेट्रो हाऊसची आग अखेर नियंत्रणात, कुलाबा परिसरात धुराचे ढग
एबीपी माझा वेब टीम | 02 Jun 2016 11:35 AM (IST)
मुंबई : जवळपास सात तासानंतर कुलाब्यातील मेट्रो हाऊसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. मात्र, पाण्याच्या कमतरतेमुळं आग विझवण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यात आग वारंवार भडकत असल्यामुळं अग्निशमन दलासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. मात्र आता आग नियंत्रणात आल्यामुळं अग्निशमन अधिकाऱ्यांसह स्थानिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुपारी चारच्या सुमारास कुलाब्यातील रिगल सिनेमाजवळच्या मेट्रो हाऊसला आग लागली. बघता बघता आगीच्या ज्वालांनी मेट्रो हाऊसला पूर्णत: वेढलं होतं. सुरक्षेचे उपाय म्हणून या सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. #कुलाबा आग अपडेट : पाण्याअभावी आग विझवण्याला उशीर, भाजप आमदार राज पुरोहित यांचा आरोप #कुलाबा आग अपडेट : कुलाब्यातील इमारतीला लागलेली आग भडकली https://twitter.com/sherryshroff/status/738342431666503680 ----------------------- मुंबई : कुलाब्यातील अतिसंवेदनशील परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. गेल्या दीड तासापासून ही आग धुमसते आहे. अग्निशमन दलाच्या आठहून अधिक गाड्या आणि जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. रिगल सिनेमागृहाजवळच्या इमारतीला लागलेल्या आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र सुरक्षेचे उपाय म्हणून या सगळ्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तसंच या परिसरातील सगळ्या इमारतीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात पोलीस मुख्यालय, मनोरा आमदार निवास, कॅफे लिओपोल्ड आणि कॅफे मॉन्डेगार तसंच ताज हॉटेल अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं परदेशी नागरीक आणि हायप्रोफाईल लोकांची उठबस असते. त्यामुळं आग नियंत्रणात आणण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत.