मुंबईः महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप करत काँग्रेसने सर्व वॉर्ड कार्यालयांसमोर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. रस्त्यावरील खड्डे, रस्ते घोटाळा, नालेसफाई, इत्यादी मुद्यांवरुन काँग्रेसनं पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
कुर्ल्यातील एल वॉर्डच्या कार्यालयासमोर संजय निरुपम आणि नसिम खान यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना आणि भाजपचा गैरकारभार लवकरच लोकांपुढे ठेवू, असा इशारा यावेळी निरूपम आणि नसिम खान यांनी दिला.
मुंबई महापालिकेचा रणसंग्राम मात्र आतापासूनच सुरु झाल्याचं चित्र आहे. खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. त्यातच रस्ता घोटाळ्याचा मुद्दा देखील विरोधकांच्या हाती लागला आहे.