मुंबई/पुणे : अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं अनेक गणेशभक्त गणपतीच्या दर्शनाला जातात. मुंबई आणि परिसरातील अनेक गणेशभक्त सिद्धीविनायक मंदिरात, तर पुणेकर दगडूशेठला जातात. मात्र बाप्पाच्या दर्शनाला जाताना आरतीच्या ताटात श्रीफळ नेण्याची परवानगी भाविकांना नसेल.


सिद्धीविनायक आणि दगडूशेठ हलवाई मंदिरात श्रीफळ घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी नारळ नेण्यास आडकाठी केली आहे.

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही घातपात घडवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.