'वर्षा'वर मुख्यमंत्र्याची भाजप मंत्र्यांसह तब्बल 4 तास खलबतं!
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2016 02:28 AM (IST)
मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. याच धर्तीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीला भाजपचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान या बैठकीदरम्यान येत्या काळातील महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबद्दल चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद आणि महापालिकेची जबाबदारी पालकमंत्र्याकडे सोपवण्यात येणार आहे. त्या धर्तीवर निवडणुकीसाठी कशा प्रकारे कार्यक्रम राबवायचा, या संदर्भात सखोल चर्चा या बैठकीत करण्यात आली.