मुंबई : भाजपचा मुंबई महापालिकेसाठीचा जाहीरनामा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या (मंगळवार) प्रसिद्ध केला जाणार आहे. यामध्ये अनेक नवनवीन घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यात काय-काय असणार?

  • राज्यात सरकारी कार्यालयाला लागू असलेला 'राईट टू सर्व्हिस' (सेवेचा हक्क) प्रमाणे 'राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस' (महापालिका सेवेचा हक्क) कायदा येणार

  • जर ठराविक मुदतीत काम केलं नाही तर दंडात्मक कारवाई होणार


राईट टू वॉटर

  • मुंबईकरांना 24 तास पाणी

  • पाणी मिळालं नाही तर जबाबदारी महापालिकेची

  • महापालिकेविरुद्ध नागरिक दावा देखील ठोकू शकतात

  • पाईपलाईन फुटली तर टँकरमधून पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीही महापालिकेची असेल.

  • माहिन्यातून एकदा शहरातील सर्व रस्ते धुतले जाणार

  • मलनिसाःरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याने शहरातील रस्ते धुतले जाणार

  • ग्रीन एनर्जी अंतर्गत शहरात एलईडी दिवे लावणार

  • महिलांसाठी अधिक बजेट देणार

  • 'राईट टू पी' अंतर्गत महिला शौचालयांसाठी अधिक बजेट

  • याशिवाय महापालिकेकडून जे कर आकारले जातात त्यात मुंबईकरांना भरघोस सूट देण्याचं आश्वासन

  • पाणी दिलं नाही तर पाणीपट्टी कर नाही

  • खड्डेमुक्त रस्ते होईपर्यंत कर लादला जाणार नाही

  • मालमत्ता करात सूट

  • बाळासाहेब ठाकरे याचं भव्य स्मारक बांधणार