नालासोपाऱ्यात टेम्पोची धडक, दोन चिमुरड्यांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2017 06:12 PM (IST)
मुंबई : मुबईत नालासोपाऱ्यामध्ये भरधाव टेम्पोनं धडक दिल्यानं दोन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. आज सकाळी नालासोपाऱ्यात झालेल्या या घटनेत अलमान शेख आणि आदित्य प्रजापती या शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी शाळेत जात असताना नालासोपाऱ्यातील संतोष भुवन इथे ही मुलं रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पोनं त्यांना धडक दिली. यात अलमान आणि आदित्यचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको करत टेम्पोची तोडफोड केली. पोलिसांनी टेम्पोचालकाला अटक केली आहे, तसंच तपास सुरु केला आहे.