CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पोलिसांसाठी (Maharashtra Police) फिल्डवर उतरल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान वर्षालगत असलेल्या तोरणा बंगल्याची आज त्यांनी पाहणी केली.  इथं पोलिसांना राहण्यासाठी सुविधा नसल्याची तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तोरणा बंगल्याची पाहणी केली. यावेळी आपण माणसं आहोत ती पण माणसंच आहेत ना? असं म्हणत त्यांनी पोलीसांना राहण्यासाठी चांगली व्यवस्था करा, असे आदेश दिले आहेत. 

तोरणा बंगल्या एका खोलीत अनेक पोलीस कर्मचारी ड्यूटी करून राहत होते. पडझड झालेल्या खोलीत राहण्याची व्यवस्था असल्यानं पोलीस नाराज होते. तक्रार मिळाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी तातडीनं तोरणा बंगल्यााची पाहणी करत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. तातडीनं तोरणा बंगल्या पोलीसांना राहण्याची व्यवस्था करा असे आदेश खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील दिले होते.  सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेत आजपासून पोलिसांना राहण्याची सोय करणार असल्याचं सांगितलं आहे. 

मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्याच्या शेजारी (CM House Varsha bunglaw) असलेल्या तोरणा बंगल्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. वर्षा बंगल्यात जाताना तोरणा बंगल्यातून आत जावं लागतं, वर्षा आणि तोरणा हा शेजारीशेजारी बंगला आहे.  तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तोरणा बंगल्यात अपुऱ्या सुविधा आणि ड्युटीवरील पोलिसांना पडझड झालेल्या खोलीत राहण्याची वेळ आली होती. याबाबत तोरणा बंगल्यात ड्युटीला असणाऱ्या पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि श्रीकांत शिंदेंकडे (Shrikant Shinde) तक्रार केली होती. तोरणा बंगल्यात पोलिसांची राहण्याची चांगली व्यवस्था करा, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 

तोरणा बंगल्यात मागील अडीच वर्षांपासून राहण्याची नीट नसल्यानं मरणयातना सोसत असल्याची तक्रार इथं ड्यूटीला असलेल्या पोलिसांनी केली होती. वर्षा बंगल्यात जाताना तोरणा बंगल्यातून आत जावं लागतं. वर्षा आणि तोरणा हा शेजारीशेजारी बंगला आहे. 

तोरणा बंगल्यात एका खोलीत अनेक पोलीस कर्मचारी राहत होते. पडझड झालेल्या खोलीत राहण्याची व्यवस्था असल्यानं पोलीस नाराज होते.  खासदार श्रीकांत शिंदेंनी तातडीनं तोरणा बंगल्याची पाहणी केली आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

तातडीनं तोरणा बंगल्या पोलिसांना राहण्याची व्यवस्था करा असे आदेश खासदार श्रीकांत शिंदेंनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेत आजपासून पोलिसांना राहण्याची सोय करणार असल्याचं सांगितलं आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

वर्षाशेजारचा 'तोरणा' उपेक्षित! पोलिसांची गैरसोय; मुख्यमंत्री शिंदेंकडून अधिकाऱ्यांना थेट आदेश

BDD Chawl : बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयात घरं मिळणार, शासन निर्णय जारी