मुंबई : बीडमधील सरपंच हत्याप्रकरणाचा सीआयडी पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेल्या एसआयटीकडून हा तपास होत आहे. मात्र, तपास अधिकाऱ्यांकडून पीडित देशमुख कुटुंबीयांना हवी ती माहिती दिली जात नाही,त्यामुळे धनंजय देशमुख यांनी आज टाकीवर चढून आंदोलन केले. तसेच, माझ्या भावासारखंच मलाही मारुन टाकलं जाईल, त्यापेक्षा मीच जीवन संपवतो म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केला. त्यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन धनंजय देशमुख यांचे मन वळवले. दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याप्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik karad) 302 चा आरोपी करावा, अशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस (police) अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत.  

Continues below advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कावत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन करुन मस्साजोग हत्याकांडप्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचनात्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कुणालाही दयामाया दाखवू नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्‍यांनी तपास अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. 

मराठा क्रांती मोर्चा चे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनीही मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली. आज आम्ही मुख्यमंत्री यांना निवेदन द्यायला आलो होतो. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी निवेदन द्यायला आलो होतो पण मुख्यमंत्र्‍यांकडे वेळ नव्हता. त्यामुळे, आम्ही निवेदन गेटवर चिटकवलं आणि ठिय्या आंदोलन करु अस सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्र्‍यांकडून आम्हाला भेटीची वेळ देण्यात आली, आमचं निवेदनही स्वीकारलं, अशी माहिती रमेश केरे पाटील यांनी दिली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, यात लक्ष घातलं तर ठीक आहे नाहीतर मराठा ससामाज मुख्यमंत्री असो किंवा कोणी आम्ही त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा केरे पाटील यांनी दिला. त्यावर, न्याय मिळवुन देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्‍यांनी पाटील यांना दिलं आहे. 

Continues below advertisement

विष्णू चाटेला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी

दरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यास न्यायालयाने 7 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. 18 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, विष्णू चाटे आता जामीनासाठी अर्ज करु शकतो. मात्र, मोक्का अंतर्गत गुन्हा असल्याने विष्णू चाटे आता जामीन मिळवण्याठी फक्त विशेष न्यायालयात अर्ज करू शकतो, इतर कोर्ट जामीन देऊ शकत नाही. मराठवाड्यासाठी मोक्का न्यायालय संभाजी नगरला आहे. चाटे याने जामिनासाठी अर्ज केल्यास पुढील सुनावणी आता संभाजी नगरमध्ये होईल. त्यामुळे, चाटेला जामीन मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा

12 डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड अन् पोलीस अधिकाऱ्याची बैठक; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक आरोप