कोपर्डीला चाललेल्या रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी परत बोलावलं!
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2016 05:20 AM (IST)
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोनमुळे रामदास आठवलेंना आपला कोपर्डी दौरा रद्द करावा लागला आहे. कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी आठवले आज मुंबई विमानतळावर पोहोचलेही होते. विमानतळावर असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांचा रामदास आठवलेंना फोन आला. कोपर्डीतल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही कोपर्डीला जाऊ नका अशी सूचना त्यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे आठवलेंना विमानतळावरून परतावं लागल्याचं समजतं आहे. कोपर्डीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केल्याचं आठवलेंच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे.