मुंबई : डोंबिवलीतील प्रोबेस कंपनी स्फोटातील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने आदेश दिले आहेत. येत्या 26 मे रोजी प्रोबेस कंपनीतील स्फोटाला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
7 कोटी 43 लाख 27 हजार 990 रुपये एवढी नुकसान भरपाई मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नुकसान भरपाईन दिली जाणार आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा आदेश देण्यात आला.
भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली
डोंबिवली एमआयडीसीत स्फोटात 23 जणांचा मृत्यू, तर सुमारे 161 जण जखमी झाले. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत केमिकल रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला.
स्फोट इतका भीषण होता की 5 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला होता. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या होत्या.