'पानिपत'कार विश्वास पाटील यांचा पाय आणखी खोलात
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2017 08:35 AM (IST)
निवृत्तीआधी एका महिन्यात विश्वास पाटील यांनी तब्बल 137 प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानंतर या प्रकरणात काळंबेरं असल्याची शंका आल्यानंतर चौकशीसाठी 4 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती.
मुंबई : निवृत्तीच्या काळामध्ये अवैधरित्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप असलेले माजी एसआरए प्रमुख विश्वास पाटील यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण विश्वास पाटील यांनी मंजूर केलेल्या तब्बल 33 फायलींमध्ये अनियमितता असल्याचं समोर आल्याची माहिती आहे. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने हा अहवाल दिला आहे. निवृत्तीआधी एका महिन्यात विश्वास पाटील यांनी तब्बल 137 प्रस्तावांना मंजुरी दिली होती. त्यानंतर या प्रकरणात काळंबेरं असल्याची शंका आल्यानंतर चौकशीसाठी 4 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती.