मुंबई : एकदा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्याची आशा आपण सोडून देतो. मात्र कल्याण पोलिसांमुळे तब्ब 186 जणांना आपले मोबाईल मिळाले आहेत.

कल्याण आणि उल्हासनगर परिसरातून चोरीला गेलेले तब्बल 186 मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत  केले आहेत. तर यात तब्बल 22 लाख रुपयांचा हा मुद्देमाल समारंभपूर्वक परत करण्यात आला.

पोलिसांच्या संयुक्त पथकानं 19 मोबाईल चोरांना अटक करत, त्यांच्याकडून 186 मोबाईल जप्त केले. हे मोबाईल परत करण्यासाठी, कल्याणात पोलिसांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातून अनेकांचे मोबाईल चोरीला गेले होते. मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर या मोबाईल चोर टोळीचा बंदोबस्त करण्याचं आव्हान होतं.

पण, परिमंडळ 3 आणि 4 च्या पोलिसांच्या संयुक्त पथकाने 19 मोबाईल चोरांना शिताफिनं पकडलं आहे. त्यांच्याकडून 186 मोबाईल, आणि 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.