मुंबई : मुंबईतील लहान मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून प्रतापगड किल्ला बनवला आहे. दिवाळीत लहान मुलं मोठ्या आवडीने मातीचे किल्ले बनवत असतात. मात्र या मुलांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करुन किल्ला साकारल्याने सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
घाटकोपरमधील पारशीवाडी विभागातील या लहानग्यांनी सहा फूट रुंद आणि दोन फूट उंच असा हा प्रतापगड साकारला. प्लास्टिकच्या बॉटलपासून तोफ, बॉक्सच्या पुठ्ठयांपासून गडाचे दरवाजे, सिमेंटचे तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि विटांपासून गडाची तटबंदी तयार केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या किल्ल्यावर विराजमान करून त्यासमोर मावळे आणि भगवे झेंडेही तयार करून लावण्यात आले आहेत. त्याच्या बाजूने गवताचे सुंदर असे नक्षीकाम करून हा किल्ला हुबेहूब साकारण्याचा या मुलांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे.
त्याचबरोबर प्रतापगडाचा इतिहास देखील त्यांनी या निमित्ताने वाचला असून किल्ले पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना ते हा इतिहास सांगत आहेत. त्यामुळे हा किल्ला सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.
एकूणच या मुलांनी टाकाऊ वस्तूंचा वापर तर केलाच, मात्र त्यासोबत इतिहास जपण्याचे कामही केले आहे.
टाकाऊ वस्तूंपासून लहानग्यांनी साकारला प्रतापगड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2018 08:41 PM (IST)
त्याचबरोबर प्रतापगडाचा इतिहास देखील त्यांनी या निमित्ताने वाचला असून किल्ले पाहण्यास येणाऱ्या नागरिकांना ते हा इतिहास सांगत आहेत. त्यामुळे हा किल्ला सध्या कौतुकाचा विषय झाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -