मुंबई : मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचं त्यानं सांगितलं. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.


मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेतला जातो. तो अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आलेला असल्याचेही मंत्री परब यांनी सांगितले. दुबईहून मातोश्री वर तीन ते चार फोन आल्याची माहिती आहे. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली नसल्याचे परब यांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.


एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा गंभीर आरोप


निनावी फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सूचना दिल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री काही कामानिमित्त घराबाहेर पडले आहेत.


मातोश्रीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त
धमकी आल्यानंतर मातोश्रीबाहेर कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मातोश्री मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. निवासस्थानाबाहेर पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली असून अजून पोलीस कुमक बोलवण्यात येणार आहे. सध्या सायबर पोलीस या फोन कॉल्सची तपास करत आहे. आता हा फोन दाऊदच्या गँगकडून आला आहे की अन्य कोणी खोडसाळपणा केला? याचाही तपास केला जात आहे. जर कोणी तसा खोडसाळपणा केला असेल तर त्याचीही गय केली जाणार नसल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले आहे.


कडक कारवाई करणार : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई
मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मी मंत्री आहे. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. जगाच्या पाठीवर मातोश्रीला हात लावणारा जन्माला यायचा आहे. त्यामुळे यातून कोणीही पुढे आला तरी त्याची हयगय करणार नाही, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.


Sanjay Raut on Kangana Ranaut | कंगना रनौतने माफी मागितली तर विचार करेन : संजय राऊत