नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तित हेव्यादाव्यांचं अतिशय किळसवाणं रुप चव्हाट्यावर आल्याने कालच्या घटनेचा अहवाल देण्यासाठी मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहेत.
संजय दिना पाटलांच्या आजुबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याची दृश्य कॅमेऱ्यानं टिपली आहेत. याच कार्यक्रमात संजय दिना पाटील यांनी गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केला आहे.
मुंबईतल्या चेंबूरमध्ये 141 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता. त्यावेळी संजय दिना पाटील 7 ते 8 बंदुकधाऱ्यांसह आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केल्याची आरोप नवाब मलिकांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना दिली.
दरम्यान या प्रकरणी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत. नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडे तलवार आणि चॉपर सारखी हत्यारं होती, असा पलटवार संजय दिना पाटलांनी केला आहे.
VIDEO:
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार