मुंबई : उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत. 23 मार्च 2020 ते 9 सप्टेंबर 2020 या काळात मध्य रेल्वेने 23.225 दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वी पूर्तता केली.



मध्य रेल्वेने दिनांक 23.3.2020 ते 9.9.2020 पर्यंत 9,279 मालगाड्या चालविल्या. त्यातून 4,42,944 वॅगन्स भरून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व पोलाद, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची मालवाहतूक करण्यात आली आहे. या कालावधीत दररोज सरासरी 2,590 वॅगन्सची मालवाहतूक केली गेली.


राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश, मग सहकारी बँक कर्मचाऱ्यांना का नाही?


मध्य रेल्वेने अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या 1,67,023 वॅगन्स विविध वीज प्रकल्पांपर्यंत नेल्या. तसेच अन्नधान्य आणि साखर 5,155 वॅगन्स; शेतकर्‍यांच्या हितासाठी 20,543 खतांची वॅगन्स व 6,555 कांद्याचे वॅगन्स; पेट्रोलियम पदार्थांचे 43,824 वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या 11,747 वॅगन्स; सिमेंटची 28,299 वॅगन्स; 1,37,760 कंटेनर वॅगन्स आणि सुमारे 22,038 डी-ऑईल केक आणि संकीर्ण वस्तूंचे वॅगन्स वाहून नेले.



मध्य रेल्वेवर क्षेत्रीय स्तरावर आणि विभागीय स्तरावर बहु-अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना रेल्वेने केली आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला हा घटक रेल्वेमार्फत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधतो. मध्य रेल्वेने प्रसिद्ध पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.


रविवार 13.9.2020 रोजी 5व्या व 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक. मेन लाइन आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक नाही.

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी 5व्या व 6व्या मार्गावर मेगा ब्लॉक संचालीत करणार आहे. ठाणे-घाटकोपर 5व्या व 6व्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत

घाटकोपर-लोकमान्य टिळक टर्मिनस 5व्या व 6व्या मार्गांवर दुपारी 1 ते दुपारी 2.30 आणि दुपारी 3. 15 ते संध्याकाळी 6.45 पर्यंत तसेच दिवा-कल्याण 5व्या व 6व्या मार्गांवर सकाळी 11.15 ते दुपारी 2.15 पर्यंत तथापि, वेळापत्रकानुसार विशेष उपनगरी सेवा चालवल्या जातील. पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हा देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर व्यक्त केली आहे.

Lockdown | Mumbai Local | लोकल सुरु करण्यासाठी विरार रेल्वे स्थानकात आंदोलन