मध्य रेल्वेचा दिलासा, नववर्षाला चार विशेष लोकल धावणार
एबीपी माझा वेब टीम | 30 Dec 2016 03:00 PM (IST)
मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. नववर्षाला सीएसटी ते कल्याण आणि सीएसटी ते पनवेल या मार्गावर मध्य रल्वेच्या चार उपनगरीय विशेष लोकल धावणार आहेत. या विशेष लोकल मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर धावणार आहेत. तसंच या लोकल सर्व स्टेशनवर थांबतील. थर्टी फर्स्ट पार्टी करुन रात्री उशिरा घरी परतणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या मार्गावर लोकल ट्रेन धावणार मध्य रेल्वे मार्ग कल्याणला जाणारी विशेष ट्रेन रात्री 1.30 वाजता सीएसटी स्टेशनवरुन सुटेल आणि कल्याणला 3 वाजता पोहोचेल. सीएसटीला येणारी विशेष ट्रेन रात्री 1.30 वाजता कल्याण स्टेशनवरुन सुटेल आणि सीएसटीला 3 वाजता पोहोचेल. हार्बर रेल्वे मार्ग पनवेलला जाणारी विशेष ट्रेन रात्री 1.30 वाजता सीएसटी स्टेशनवरुन सुटेल आणि पनवलेला 2.50 वाजता पोहोचेल. सीएसटीला येणारी विशेष ट्रेन रात्री 1.30 वाजता पनवेल स्टेशनवरुन सुटेल आणि सीएसटीला 2.50 वाजता पोहोचेल.