मुंबई: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. आसनगावजवळ मंगळवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर लोकलसेवा विस्कळीत झाली होती. ती अजूनही कायम आहे.

त्यातच मुंबईत मंगळवारी झालेल्या तुफान पावसामुळे अनेक लोकल्स बिघडल्या आहेत. त्यामुळे लोकल रेल्वेंची संख्या कमी आहे.

तसंच रेल्वेचं कोलमडलेल्या टाईमटेबलमुळे सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या निर्धारीत वेळेपेक्षा अनेक तास उशिरा धावत आहेत. त्याचाही ताण लोकल वाहतुकीवर पडला आहे.

त्यामुळे गेल्या 3 दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कटलेलीच आहे. मध्य रेल्वेच्या लोकल जवळपास अर्धा तास उशिरानं धावत आहेत. तर दुसरीकडे टिटवाळा-कसारा मार्ग अजूनही ठप्प आहे. त्यामुळे अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात मध्य रेल्वेच्या 35 लोकलमध्ये तर पश्चिम रेल्वेच्या 7 लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर काल रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या चालविण्यात आल्या. त्यामुळे या 35 तांत्रिक बिघाड झालेल्या लोकल रुळावर यायला आणखी दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरले






आज रद्द कण्यात आलेल्या लोकल

- नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)
- नागपूर-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस (येणारी)
- मनमाड-एलटीटी राज्यराणी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)
- मनमाड-एलटीटी गोदावरी एक्प्रेस (येणारी/जाणारी)
- अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)
- सीएसएमटी - फिरोजपूर पंजाब मेल (येणारी/जाणारी)
- हरिद्वार - एलटीटी एसी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)
- लखनौ - सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस (जाणारी)
- पाटलीपुत्र - एलटीटी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)
- हाथिया - एलटीटी एक्स्प्रेस (उद्या येणारी)
- एलटीटी - हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (उद्या येणारी)
- कन्याकुमारी - सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी)
- नागरकॉयल - सीएसएमटी एक्स्प्रेस (येणारी)
- सिकंदराबाद - सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस (येणारी/जाणारी)

मनमाड-दौंड-पुणे-कर्जत वरून वळवण्यात आलेल्या गाड्या -
- अलाहाबाद-एलटीटी तुलसी एक्स्प्रेस
- हावडा-सीएटएमटी मेल

पुनर्गठीत करण्यात आलेल्या गाड्या -
एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस जी दुपारी 1.40ला कल्याणला येते ती रात्री साडे नऊ वाजता येईल..म्हणजे जवळपास 8 तास उशिरानं धावते आहे.

संबंधित बातम्या

दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे कल्याणजवळ घसरले