Mumbai Local Mega Block :  मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी 12 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या आणि हार्बर रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. 



सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन  त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.   ठाण्याच्या पुढील असलेल्या या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व  नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.


ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.


हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक


 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन  हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि
 चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी आणि वांद्रे/गोरेगाव येथून  सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता  सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील.


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
 
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा सुमारे 20 मिनिटांच्या वारंवारतेने चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.