मुंबई: मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. यामुळं सकाळी 8 ते 9 दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरच्या 9 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.या मार्गावरची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत आहेत.
मोटरमनच्या रिक्त जागा त्वरीत भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा, या मोटरमन्सच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यासाठी मोटरमन्सनी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचं मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केलं आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि मोटरमन युनियनची दुपारी 12 वाजता सीएसएमटी इथं बैठक बोलवण्यात आली आहे. मोटरमन्सच्या असहकार आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दिवसभरात यामुळं रेल्वेच्या 150 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे.
रेल्वेतील मोटरमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत रेल्वेच्या फेऱ्या सुरळीत पार पडण्यासाठी मोटरमनला ओव्हरटाईम करावा लागतो. परिणामी ओव्हरटाईम न केल्यास मध्य रेल्वेच्या सुमारे 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.
दरम्यान मध्य रेल्वे आणि मोटरमन युनियन यांच्यात या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत बैठक सुरु होती. मात्र चर्चा निष्फळ ठरल्यामुळे शुक्रवारी सकाळी चर्चेअंती निर्णय घेणार असून, आम्ही आमच्या घोषणेवर ठाम असल्याचे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने सांगितले.
मोटरमन्सला पूर्ण आठवड्यात 104 तास काम करावे लागते. यापेक्षा जास्त काम केल्यास तो ओव्हरटाईम गृहित धरला जातो. या ओव्हरटाईमच्या बदल्यात मोटरमनला वरिष्ठतेनुसार 700 ते 1200 रुपये प्रतितास इतके वेतन मिळते.
सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात 3 घटना अशा झाल्या ज्यामध्ये युनियनशी निगडित मोटरमनने सिग्नल ओलांडून गाड्या पुढे नेल्या. त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी यासाठी एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न या युनियन्सकडून केला जात आहे.
मध्य रेल्वेवर मोटरमन नसल्याने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द!
मोटरमन्सचा ओव्हरटाईमला नकार, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Aug 2018 09:55 AM (IST)
मध्य रेल्वेच्या मोटरमन्सनी ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे. यामुळं सकाळी 8 ते 9 दरम्यान मध्य रेल्वे मार्गावरच्या 9 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -