Mumbai Mega Block Local Updates: मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा, मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण
Mumbai Mega Block Local Updates: ठाणे स्थानकात स्थानकात तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
Central Line: मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा... मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण झाले आहे. मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू झाली आहे.
ST Buses : मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा गाड्या
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द
पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी 40 जादा बसेस
रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर पडणार प्रवाशांचा ताण
याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन
मुंबईसाठी पुणे स्टेशन येथून 40 जादा बसेस सोडण्यात येणार
Mega Block: मुंबईतील जम्बो मेगाब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं आधीच पूर्व कल्पना द्यायला हवी होती, तसंच सर्व प्रवासी संघटनांसोबत बैठका घेऊन चर्चा करायला हवी होती, मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता अरगडे यांची प्रतिक्रिया.
Mulun Airoli Traffic Updats : ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड -ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी झालीय. ट्रेलर घसरल्यामुळे मुंबई कडून ( ऐरोली ) उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.एक ते दीड किलोमीटर गाड्यांचे रांग...आधीच ट्रेन्स नाही आणि नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी..
मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळे मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड -ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी. ट्रेलर घसरल्यामुळे मुंबई कडून ( ऐरोली ) उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. एक ते दीड किलोमीटर गाड्यांचे रांग. आधीच ट्रेन्स नाही आणि नवी मुंबईला जाण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडी.
Mega Block Updates: मध्य रेल्वेनं का घेतलाय मेगाजम्बो ब्लॉक? याचा आढावा एबीपी माझानं थेट सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10/11 वरून आढावा घेतलाय. या फलाटांच्या रूंदीकरणाचं काम पूर्ण झालं असून ही लाईन कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हा ब्लॉक घेतलाय. या रूंदिकरणामुळे आता इथं 16 ऐवजी 24 डब्यांच्या लांब पल्याच्या गाड्या थांबवता येतील. इंटरलॉकिंग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर या गोष्टी सुरू करण्याकरता आज रात्रीपासून हा ब्लॉक सुरू होईल. त्याकरता शुक्रवारी मध्यरात्रीनंतर रविवार दुपारपर्यंत सीएसएमटीची मध्य रेल्वे ही भायखळा रेल्वे स्थानकापर्यंतच तर हार्बर मार्गिका ही वडाळ्यापर्यंतच अप आणि डाऊन सुरू राहिल.
Thane Mega Block Update: ठाणे रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा
फलाट क्रमांक चारवर बंद केलेली लोकल वाहतूक सुरु
कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणारा धीम्या रेल्वे मार्ग मोकळा,
रात्रीपासून फलाट क्रमांक चारची रेल्वे वाहतूक करण्यात आली होती बंद, या मार्गिकेवर 12 तासांचा होता मेगा ब्लॉक
फलाट क्रमांक चार वरून धिम्या गतीच्या लोकल सुरू
त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा
Western Railway Block: पश्चिम रेल्वेच्या विरार ते वैतरणादरम्यानच्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. विरार ते वैतरणादरम्यान पूल क्रमांक ९०वरील स्टीलचा गर्डर बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२.२० ते रविवारी पहाटे ६.२० पर्यंत पश्चिम रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे २ जूनला पहाटे ५.३५ ची विरार-डहाणू रोड आणि सकाळी ७.१० ची डहाणू रोड ते चर्चगेट लोकल रद्द राहणार आहे. तर विरार-संजान मेमू, वांद्रे टर्मिनस भुसावळ-वांद्रे टर्मिनस या लोकल आणि मेल- एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. याशिवाय २६ रेल्वेगाड्या विविध स्थानकांत थांबवण्यात येणार आहेत
Kurla Bus Depot: मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे बेस्ट प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.महाजम्बो ब्लॉकचा परिणाम सकाळपासूनच सर्व रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट प्रशासनाच्या वतीने बस सोडल्या गेल्या आहेत.
Mumbai Mega Block : आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल तेव्हा यात फरक पडेल.
Thane Block : ठाणे स्थानकात स्थानकात ६२ तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर ६२ तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर १२ तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. गाड्यात २० ते २५ मिनिटं उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झालेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा यामुळे प्रवासी हैराण
Train Cancelled :मेगा ब्लॉकमुळे आज रद्द झालेल्या ट्रेन खालीलप्रमाणे
१२७०२ - हैदराबाद-सीएसएमटी टर्मिनस हुसेन सागर एक्स्प्रेस
१२११२ - अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस
१७४१२ - कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
१२२९०- नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस
१२२६२ - हावडा-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेस
१७६११ नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
Mumbai Megablock Udate: मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी व अधिकाऱ्यांना मुभा
मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे कार्यालयात येणं गैरसोयीच आणि कठीण
त्यामुळे अधिकारी कर्मचारी गैरहजर राहतील त्यांची रजा कापली जाणार नाही
इतर कोणत्याही दिवशी कार्यालयात या दिवसाची भरपाई करण्याची मुभा देण्यात आली आहे
याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक जारी केले आहे
Thane Mega Block : काल रात्रीपासून ठाण्यात 63 तासांचा मेगाब्लॉक सुरू असून रविवारी दुपारपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.. ठाणे स्थानकावरील ५ आणि ६ प्लॅटफॉर्मवरील रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येतोय.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील १० आणि ११ क्रमांकाच्या फलाटाची लांबी वाढवण्यासाठी आज रात्रीपासून ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे..
पार्श्वभूमी
Mumbai Mega Block Local Updates: ठाणे स्थानकात स्थानकात 62 तासांच्या मेगाब्लॉकला मध्यरात्रीपासूनच सुरूवात झालीय. मुंबईहून कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट मार्गावर 62 तासांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या स्लो मार्गावर 12 तासांचा हा मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर यामुळे वेळापत्रक कोलमडलंय. गाड्यात 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. आज कामाचा दिवस असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल सुरू झालेत. कल्याण डोंबिवली ठाणे या प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे. सकाळची कामाची वेळ, उकाडा आणि गाड्या उशिरा यामुळे प्रवासी हैराण झालेत. आज मध्य आणि हार्बर मार्गावरील 161 लोकल रद्द आहेत, सध्या ठाणे स्थानकात 20 मिनिटांनी एक अशी मुंबईकडे जाणारी लोकल येत आहे. एकच ठिकाणी फास्ट आणि स्लो लोकल येत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ आहे, दुपारनंतर जेव्हा ठाणे स्थानकात मुंबईकडे जाणारा स्लो ट्रॅक सुरू होईल तेव्हा यात फरक पडेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -