मुंबई : चकचकीत आणि पारदर्शी छत असलेली अत्याधुनिक विस्टाडोम कोचची बोगी दादर-मडगाव एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात रेल्वेला प्रस्ताव देण्यात आलाय.त्यामुळे रेल्वेही याबाबत सकारात्मक उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.
भारतीय तथा परदेशी पाहुण्यांसाठी रेल्वेचा प्रवास अजून सुखकर व्हावा, तसेच पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने नव्या विस्टाडोम कोचचा अंतर्भाव असलेली ट्रेन सुरु केली. एप्रिलमध्ये या ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भुवनेश्वरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या नव्या ट्रेनचं लोकार्पण केलं.
यानंतर ही ट्रेन लवकरच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल असं बोललं जात होतं. त्यानुसार या ट्रेनचा एक रेक याच महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत दाखल झाला होता. त्यानुसार, पारदर्शी छत, मोठ्या काचेच्या खिडक्या असल्याने प्रवासी प्रवास करताना एक वेगळा अनुभव मिळू शकतो. शिवाय फिरणाऱ्या खुर्च्या, जी. पी. एस यंत्रणा, ऑटोमॅटिक दरवाजे, एलसीडी यांसह अनेक सोयी सुविधा आहेत.
विस्टाडोमचे डबे मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेसमध्ये जोडला जावेत, या मागणीचा प्रस्ताव नुकताच मध्य रेल्वेच्या वतीने रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आला असून, या प्रस्तावावर सकारात्मक उत्तर येण्याची अपेक्षा आहे.
त्यानंतर 16 सप्टेंबरपासून या कोचचा रेक सुरुवातीला दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडला जाणार आहे. पण या विस्टाडोममधून प्रवास करायचा असल्यास, प्रवाशांना जवळपास 2 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकारक करण्यासाठी तेजस एक्स्प्रेसनंतर, रेल्वेकडून विस्टाडोमच्या रुपानं नवं गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे कोकणवासींयाचा प्रवास अधिकच सुखकारक आणि आरामदायी होणार आहे.
संबंधित बातम्या
VIDEO : मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच सहभागी होणारी विस्टाडोम कोच ट्रेन कशी आहे?
रेल्वे प्रवास अजून सुखावणार, भारतीय रेल्वेची 'विस्टाडोम कोच' ट्रेन सुरु
विस्टाडोमचे पारदर्शक डबे लवकरच जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडले जाणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2017 09:36 AM (IST)
अत्याधुनिक विस्टाडोम कोचची बोगी दादर-मडगाव एक्सप्रेसला जोडला जाणार आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात रेल्वेला प्रस्ताव देण्यात आलाय.त्यामुळे रेल्वेही याबाबत सकारात्मक उत्तर देईल अशी अपेक्षा आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -