रात्री सव्वा नऊ वाजता कळवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याचं निदर्शनास आलं. अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेची स्लो ट्रॅकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
दरम्यान, आज सकाळीही मध्य रेल्वेचा खोळंबा झाला होता. कल्याण स्थानकादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशीरानं धावत होत्या.