मध्य रेल्वे विस्कळीत, पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 31 Jul 2016 05:59 AM (IST)
मुंबई : जोरदार पावसामुळे मुंबईतील मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. पारसिक बोगद्याजवळ ट्रॅकवर पाणी आणि माती आल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. सीएसटीकडे जाणारी मध्य रेल्वेची जलद वाहतूक सध्या धीम्या मार्गावरुन वळवण्यात आली आहे. रविवार असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा टळलेला असला तरी पावसात बाहेर निघालेल्या प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातही पाणी : ठाणे रेल्वे स्थानकातही पावसामुळे प्रचंड पाणी साचलं आहे. सकाळपासून कल्याण, ठाणे, मुलुंड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.