मुंबई : वेगवेगळ्या तांत्रिक कामांमुळे मुंबई लोकलच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान तिन्ही रेल्वेमार्गांवरील काही सेवा रद्द होणार आहेत. तर काही लोकल 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.

 

पश्चिम रेल्वे - सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत माहिम ते अंधेरी अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक

या मेगाब्लॉकमुळे  हार्बर रेल्वेची वाहतूक काहीकाळ बंद राहणार आहे.

 

मध्य रेल्वे - सकाळी 11.20  ते दुपारी 3.50  दरम्यान माटुंगा ते मुलुंड डाऊन स्लो ट्रॅकवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे माटुंगा स्थानकापुढे जाणाऱ्या सर्व स्लो लोकल फास्ट ट्रॅकवरुन चालवल्या जातील.

 

हार्बर रेल्वे - सकाळी 11.20  ते दुपारी 3.40  दरम्यान सीएसटी ते चुनाभट्टी आणि सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गांवर जंबोब्लॉक

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे सीएसटी-अंधेरी आणि सीएसटी-पनवेल यादरम्यानच्या लोकल पूर्णपणे रद्द असतील. पनवेल-कुर्ला दरम्यान काही विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.