VIDEO: मालाड स्टेशनवर तरुणाने सुसाट लोकलसमोर स्वत:ला झोकून दिलं
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 18 Jun 2018 10:21 AM (IST)
एक व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाताना दिसतोय. त्यानंतर समोरुन गाडी येताच अवघ्या काही सेकंदात त्यानं स्वत:ला गाडीसमोर झोकून दिलं
मुंबई: मुंबईतल्या मालाड स्थानकावर लोकलसमोर उडी घेऊन एका तरुणाने आयुष्य संपवलं. 12 जून रोजी सकाळी 8 वाजून 28 मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी आज जारी केलं. एक व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाताना दिसतोय. त्यानंतर समोरुन गाडी येताच अवघ्या काही सेकंदात त्यानं स्वत:ला गाडीसमोर झोकून दिलं. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे तब्बल 6 दिवसानंतरही या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. ही दृश्यं इतकी भयानक आहेत, की बघणाऱ्यांच्या अंगावर काटा यावा. हा व्हिडीओ दाखवून कुठलीही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न नाही. मात्र या व्यक्तीबाबत तुम्हाला माहिती मिळाली तर कृपया पोलिसांना कळवा, कारण यामुळे त्याची ओळख पटवण्यास मदत होईल.