CBSE 10th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावेळी डोंबिवलीतील विद्यार्थिनीनं चांगले गुण मिळवत यश मिळवलं आहे. डोंबिवलीतील दीक्षा सुवर्णा या विद्यार्थिनीने दहावीत 99.60 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. या यशाबद्दल तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच तिला हे यश मिळाल्याचं सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दीक्षाला इंग्रजी, गणित आणि सोशल सायन्स या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. दीक्षा डोंबिवलीतील होली एंजल स्कूलची विद्यार्थिनी आहे.
 
सीबीएसई बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार 22 जुलै रोजी लागला. भविष्याचा मार्ग या निकालावर अवलंबून असल्याने विद्यार्थी आणि पालक या निकालाकडे नजरा लागल्या होत्या. डोंबिवलीतील सुरेंद्र सुवर्णा आणि रोहिणी यांच्या मुलीला या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळालं आहे. दीक्षाला 99.60 टक्के गुण मिळालेले पाहून सुरुवातीला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. दिक्षाने या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक  आणि मित्रांना देत त्यांचे आभार मानले आहेत.  


लहानपणापासून कमालीची हुशार असलेल्या दीक्षाला 95 टक्के गुण तरी मिळतील अशी पालकांना अपेक्षा होती. यामुळेच पुढे काय करायचे याचे आराखडे त्यांनी काढले होते. निकाल लागला आणि दीक्षाला 99.60 टक्के गुण मिळाले. दीक्षाला मिळालेलं हे यश पाहून दीक्षा आणि तिचे आई वडील अतिशय आनंदी झाले आहेत. दीक्षाच्या आईवडिलांनी दीक्षाबद्दल बोलताना सांगतलं की, दीक्षाला आम्ही कधी अभ्यास कर असे सांगितलंच नाही. तिने या यशासाठी भरपूर मेहनत घेतली. हे सांगताना आपल्याला दीक्षाचा अतिशय अभिमान असल्याचे तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI