CBI Shuts Case Against Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांना सीबीआयकडून (CBI) मोठा दिलासा मिळाला आहे. पांडे यांच्या कंपनीविरोधात सीबीआयनं केस दाखल केली होती. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष कोर्टासमोर सादर केला आहे. याची पुढची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

संजय पांडे यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आयसेकनं ऑडिट केलेल्या 2 स्टॉकब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. या ऑडिटमध्ये अनेक गैरप्रकार आढळल्याचा आरोप सीबीआयनं केला होता. मात्र पुरेसे पुरावे न सापडल्यानं आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. कोर्ट हा रिपोर्ट स्वीकारतं की नाकारतं? ते 14 तारखेच्या सुनावणीत कळणार आहे. 

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना मोठा दिलासा मिळाला असून सीबीआयने त्यांच्याशी संबंधित कंपनीच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. पांडे यांनी आयसेक सर्व्हिसेस नावाची कंपनी स्थापन केली होती, ज्या कंपनीला NSE को लोकेशन घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं होतं. सीबीआयनं याच प्रकरणात आता क्लोजर रिपोर्ट दाखल करत आयसेक कंपनीशी संबंधित प्रकरणात तपासादरम्यान पुरेसे पुरावे आढळले नसल्याचं सांगितलं आहे. अद्याप तरी हा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला नाही, मात्र लवकरच या प्रकरणात सुनावणीची अपेक्षा आहे. दरम्यान, दिल्ली सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला होता. ज्यामध्ये संजय पांडे यांना अटकही झाली होती.

 

पाहा व्हिडीओ : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा, CBIकडून क्लोजर रिपोर्ट सादर



प्रकरण नेमकं काय? 



संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी आयटी कंपनी सुरू केली होती. मात्र काही काळानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. त्याच वेळी त्यांच्या मुलाला कंपनीचे संचालक बनवण्यात आले. 2010 ते 2015 दरम्यान, Isaac Services Pvt Ltd कंपनीला एनसीई सर्व्हर आणि सिस्टम सिक्युरिटीसाठी कंत्राट देण्यात आलं होतं. एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे  यांच्या आयटी कंपनीनं इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे. या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले असल्याचंही बोललं जात होतं. याचप्रकारणी संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अखेर आता त्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कंपनीविरोधात सीबीआयनं केस दाखल केली होती. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं विशेष कोर्टासमोर सादर केला आहे.