मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं मनसेच्या चिन्हातील बदलाला संमती दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या पक्षाच्या चिन्हातील बदलासाठी निवडणूक आयोगाला विनंती केली होती.


मनसेकडून 22 नोव्हेंबरला आपल्या पक्षाचं चिन्ह 'रेल्वे इंजिन' मध्ये बदल करण्यासाठी अर्ज केला होता. राज्य निवडणूक आयोगानं त्याला मान्यता दिली होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं त्याला मंजूरी दिली नव्हती.

केंद्रीय निवडणूक आयोगानं मनसेच्या पक्षाच्या चिन्हातील बदलाला 19 डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. त्याची प्रत नुकतीच मनसेला सुपूर्द करण्यात आली आहे.

मनसेचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन आहे. मात्र मनसेला त्यात छोटासा बदल करायचा होता. मनसेच्या निर्मितीनंतर याच चिन्हावर निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. मात्र 2012 साली मनसेनं चिन्ह बदलून डावीकडून उजवीकडे जाणारं रेल्वे इंजिन चिन्ह म्हणून घेतलं होतं. आता पुन्हा जुनंच चिन्ह मनसेनं मागून घेतलं आहे.

मनसेचं पहिलं निवडणूक चिन्ह: