मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्या महिले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. तर सुनैना होले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
गेले काही दिवस ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अॅड. धरम मिश्रा यांनी केला आहे.
नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्या घटनाक्रमापासून ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत सर्व प्रसंगांवर टीका टिप्पणी पोस्टमधून केली जात होती. काही पोस्टमध्ये तर अतिशय खालच्या भाषेचा वापर केला गेला होता तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला गेला. याच्या विरोधात शिवसैनिकांनमध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याचे प्रतिसादही उमटत होते. नालासोपारा मधील युवा सेनेचे विभाग अधिकारी रोहन चव्हाण यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे
या प्रकरणात महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आलं आहे. सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे.
Offensive Post | मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंविरोधी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा