लोकल स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरच कार घुसली, चालक पोलिसांच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम | 25 Nov 2016 09:46 PM (IST)
मुंबई: खरं तर प्लॅटफॉर्म हा प्रवाशांना ये-जा करण्यासाठी असतो. पण त्याचा विसर मुंबईतल्या एक चालकाला पडला आणि त्यानं थेट अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वरच इनोव्हा गाडी घातली. आज दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी इनोव्हा गाडीचा ड्रायव्हर राजेश यादव याला अटक केली आहे. चुकून रस्ता समजून आपण प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नेल्याचा दावा ड्रायव्हरनं केला आहे. विशेष म्हणजे या ड्रायव्हरकडे परवाना नसल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाडीच्या मालकाला बोलावून घेतलं आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.