मुंबई : माणूस इतका असंवेदनशील आणि असहिष्णू कसा होऊ शकतो, असा प्रश्न पडावा, अशी घटना मुंबईत घडली आहे. केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, चालकाला लाथा-बुक्क्याने मारहाण करुन त्याची हत्या केली गेली.
बॉम्बे सिटी हॉस्पिटलसमोर मारुती व्हॅगनारला ओव्हरटेक केले म्हणून त्यातील तीन जणांनी खाली उतरुन, ओव्हरटेक करणाऱ्या कारचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीदरम्यान चालकाचे डोके रस्त्यावर आपटले आणि तो तिथेच बेशुद्ध पडला.
यानंतर बेशुद्ध अवस्थेतील कारचालकाला राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच कारचालक मृत्यूमुखी पडला होता.
या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एकजण अद्याप फरार आहे. फरार आरोपीला शोधण्याची मोहीम पोलिसांनी सुरु केली आहे.
इमरान शेख, अब्दुल वहाब असे अटक केलेल्या आरोपींची नावं असून, वाजीद अली हा आरोपी फरार आहे.
दरम्यान, गोवंडीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारला ओव्हरटेक केल्याने वाद, कारचालकाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Feb 2018 10:13 PM (IST)
बॉम्बे सिटी हॉस्पिटलसमोर मारुती व्हॅगनारला ओव्हरटेक केले म्हणून त्यातील तीन जणांनी खाली उतरुन, ओव्हरटेक करणाऱ्या कारचालकाला बेदम मारहाण केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -