CCTV : खारघरमध्ये भरधाव गाडीने महिलेला उडवलं !
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 01 Apr 2017 12:00 PM (IST)
खारघर (नवी मुंबई ) : नवी मुंबईतील खारघरमध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला. कारने एका वृद्ध महिलेला उडवलं. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे. खारघरमधील शिल्प चौकातून महिला आपल्या घरी जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने महिलेला जबर धडक दिली. यात या महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा शर्मा असं मृत महिलेचं नाव आहे. चालक हा 17 वर्षीय तरुण असून त्याला अटक करण्यात आली आहे. पाहा बातमीचा व्हिडीओ :