मुंबई : दादरच्या सेनापती बापट रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आता स्थानिकांनीच फेरीवाले हटाव मोहीम हाती घेतली आहे. दादरच्या सेनापती बापट रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे आणि कचराकुंडींमुळेही नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे रस्त्यावरही नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


स्थानिकांनी अनेकदा महापालिकेच्या स्थानिक वॉर्ड ऑफिस आणि पोलीस स्टेशनला तक्रार करुनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर स्थानिकांनी आज रस्त्यावर उतरुन अनधिकृत फेरीवाल्यांना उठण्यास सांगितलं.

तेव्हा स्थानिक आणि फेरीवाल्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या मोहीमेचं नेतृत्व अभिनेता सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती जाधवनं केलं. तर, काही फेरीवाल्यांनी त्यांनाच दमदाटी केली. त्यामुळे तिथे फेरीवाले आणि स्थानिक रहिवाशांमध्ये वादावादी झाली.