बसच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 08:46 AM (IST)
मुंबई: मुंबईच्या साकीनाका भागामध्ये एका बसनं दोन बाईकस्वारांना धडक दिल्याची थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा बाईकस्वार गंभीर जखमी झाला आहे. काल सकाळी साकीनाका भागातल्या खैरानी रोडवरून दुचाकीवरून जाणाऱ्या अरुण पुजारी आणि सुमित चंदनशिवे यांना बेस्टच्या बसने धडक दिली. या अपघातात अरुण पुजारीचा मृत्यू झाला. तर सुमित चंदनशिवे हा जखमी झाला. या प्रकरणी चालक तानाजी कुंभारला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी बसची तोडफोड केली. याप्रकरणी 7 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.