विपिन यानंच आपल्याला दगा दिल्यानं माझ्या आत्महत्येला विपिनच जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या प्रकरणी सानपाडा पोलिसांनी विपिनला अटक केली आहे. राज कंदारी आणि विपिन थापर हे नातेवाईक आणि चांगले मित्र होते.
राज कंदारी यांनी आपला व्यवसाय थापरच्या हाती सोपवला होता. त्यानंच दगा दिल्यानं आपलं मोठं नुकसानं झाल्याचं राज कंदारी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं आता पोलीस विपिन थापर याची कसून चौकशी करत आहेत.
एक सामान्य फोटोग्राफर… ते सक्सेसफुल्ल बिल्डर… राज कंदारी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.. मात्र करिअरचा आलेख चढता असलेल्या या बिल्डरने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न उपस्थित होतो.
मूळचे ग्वाल्हेरचे कंदारी कोपरखैरणेत आले. फोटोग्राफीतून करियर सुरु केलेल्या कंदारी यांनी 15 वर्षांपूर्वी रियल इस्टेटमध्ये प्रवेश केला. छोट्या-मोठ्या दलालीतून ते बांधकाम व्यवसायात आले आणि 1998 मध्ये स्वराज बिल्डर्स अँड डेव्हपर्सची सुरुवात केली.
आधी छोट्या मोठ्या इमारतींपासून सुरु केलेल्या कंदारी हळूहळू मोठ्या इमारती बांधू लागले.
स्वराज किंग्स्टन- उलवे
स्वराज लगूना- नवे पनवेल
स्वराज डॅफोडिल्स- ऐरोली
स्वराज क्विन्स बे- कोपरखैरणे
स्वराज प्लॅनेट- कोपरखैरणे
स्वराज राज उदय- सानपाडा
असे कोट्यवधींचे 25 ते 30 मोठे प्रकल्प कंदारी यांनी उभे केले. कोपर खैरणेतली स्वराज क्वीन्स ही इमारत एकेकाळी नवी मुंबईतली 31 मजल्यांची सर्वात उंच इमारत होती. त्यांची उलाढाल जवळपास 500 ते 600 कोटींवर गेली होती. पण मग इतकं सगळं चांगलं असताना नक्की बिनसलं कुठे, हा प्रश्न कायम राहतो.
संबंधित बातम्या: