मुंबईः लोकलखाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भाईंदर रेल्वे स्थानकावर 10 जुलैला घडली आहे. भाईंदर रेल्वे स्थानकावर घडलेला हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही दृष्य आपल्याला विचलित करु शकतात.

 

 

जवळपास सहाच्या सुमारास लोकल प्लॅटफॉर्मवर दाखल होताच एका 26 वर्षाच्या तरूणानं लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे याआधी देखील अनेकांनी लोकलखाली उडी मारून अशाच प्रकारे आत्महत्या केली आहे.

 

रेल्वे अपघातांमध्ये वाढ

धावती लोकल पकडण्याच्या किंवा धावत्या लोकलमधून उतरण्याचं धाडसं अनेकांच्या जीवावर बेतलं आहे. मात्र तरी देखील मुंबईकर तीच चूक वारंवार करताना दिसत आहेत. गेल्या 7 महिन्यांत आतापर्यंत 40 जणांनी लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

 

 

पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव रेल्वे स्थानकावर धावत्या लोकलमधून उतरताना एक 55 वर्षीय महिला रेल्वे स्थानकावर पडली. तर याच लोकलच्या दुसऱ्या डब्यातून उतरणारा पोलीस कर्मचारी देखील पडला आहे.