मुंबई : 24 फेब्रुवारी रोजी रात्री प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली. कपूर कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला. आज श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पत्रक ट्वीट करुन, त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बोनी कपूर यांनी अत्यंत भावूक होऊन हे पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चाहत्यांसह सगळ्यांनाच आवाहन केले आहे की, दु:खातून बाहेर पडण्यासाठी आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा.

बोनी कपूर यांनी पत्रकात काय म्हटलं आहे?

दरम्यान, श्रीदेवी यांच्या ट्वीटर हँडलवरुन बोनी कपूर यांनी हे ट्वीट केले आहे. यापुढे श्रीदेवी यांचं ट्विटर हँडल सुरु ठेवण्यात येईल की बंद करण्यात येईल, यासंदर्भात अद्याप कोणतीच माहिती नाही.