मुंबई : जिथं पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाची बंदी उठवली. हायकोर्टाने आज हा ऐतिहासिक निर्णय दिला.

 

पुरुषांप्रमाणं महिलांनाही हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठी, डॉ. नुरजा नियाज आणि इतर संघटनांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिला.

 

याआधी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असा निकाल हायकोर्टानं दिला आहे. त्यामुळं आता हाजीअली संदर्भातही असाच निर्णय देऊन महिलांनाही प्रवेश मिळणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

 

हाजी अली दर्ग्यात सध्या महिलांना विशिष्ट मर्यादेपर्यंतच प्रवेशाची परवानगी आहे. मजार-ए-शरीफमध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. मात्र, पुरूषांच्या बरोबरीने महिलांनाही त्याठिकाणी प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात होती. आता हायकोर्टाने ही बंदी उठवत, महिलांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या:

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात दाखल, मात्र मजार प्रवेश नाही

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, राज्य सरकारची भूमिका

हाजी अली दर्गा प्रवेशासाठी मुस्लिम महिलांचा एल्गार

तृप्ती देसाई दर्ग्यात आल्यास चपलाचा प्रसाद देऊ : हाजी अराफात