शास्त्रज्ञाच्या मुलाचा मृतदेह उरणच्या समुद्र किनारी सापडला!
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 05 Oct 2018 11:14 PM (IST)
नमन दत्त गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. यासंबंधी त्याच्यावर डॉक्टरकडे उपचार सुरु होते.
नवी मुंबई : वाशीत राहणाऱ्या दत्त परिवारातील मुलगा नमन दत्त हा गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता होता. बारावी इयत्तेत शिकत असलेला नमन दत्त याचे वडील बीएआरसीमध्ये शास्त्रज्ञ आहेत, तर आई डॉक्टर आहे. नमन दत्त गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. यासंबंधी त्याच्यावर डॉक्टरकडे उपचार सुरु होते. नमन या आधीही एकदा घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा घर सोडून गेलेल्या नमनचा मृतदेह आज हाती लागली. 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नमन घरातून निघून गेला होता. वाशी रेल्वे स्थानकावर तो लोकलमध्ये चढल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. मात्र त्यानंतर तो कुठल्या रेल्वे स्थानकावर उतरला याची माहिती समोर आली नव्हती. अखेर 12 दिवसानंतर नमनचा मृतदेह एलिफन्टा समुद्र किनारी सापडला. नमनचा मृतदेह पूर्णपणे झिजला असल्याने, त्याच्या मृतदेहावरील कपडे, मोबाईल आणि घड्याळ या वस्तूंवरुन त्याची ओळख पटवण्यात आली. शिवाय, डीएनए चाचणी सुद्धा करण्यात येणार आहे.