मुंबई : पवई तलावात जाण्यापासून रोखणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला न्यूटन जोशवा नावाच्या बोटमालकाने बेदम मारहाण केली आहे. यावेळी न्यूटननं या कर्मचाऱ्याच्या अंगावर सोबत आणलेलं कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न केला. ही सर्व मारहाण सीसीटीव्हीत कैद झाली आहे. न्यूटन पवई तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता. महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोशिएशनचे कर्मचारी इम्रान शेख यानं न्यूटन जोशवाला पवई तलावात जाण्यापासून रोखलं. त्यामुळे न्यूटनने इम्रान यांच्यावर हात उगारला. एवढंच नव्हे तर स्वतःबरोबर आणलेलं कुत्रे देखील इम्रान यांच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला. याआधीही न्यूटन जोशवा वादात अडकला होता. याच न्यूटनची पवई तलावात बोट पलटल्यामुळे 3 तरुणांचा मृत्यू झाला होता. ती हाऊसबोटही न्यूटन जोशवा याची असल्यानं महाराष्टृ अँगलिंग असोशियननं न्यूटन जोशवा याचं सदस्यत्व रद्द केले होतं. त्याच रागातून ही मारहाण झाल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर अँगलिंग असोशिएशनच्या कार्यालयाचीही त्यांनी मोडतोड केल्याची तक्रार पवई पोलिसांत आहे.

बातमीचा व्हिडीओ :