मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. यासंदर्भात अण्णांनी मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने अण्णा हजारेंची याचिका तूर्तास फेटाळली आहे.


आधी संबंधित सहकारी कारखान्यांबाबत तक्रार दाखल करा, त्यानंतर आदेश देऊ, असंही मुंबई हायकोर्टाने अण्णा हजारेंच्या याचिकेवर स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप हजारे यांनी केला होता.

अण्णांनी याचिकेत सहकारी कारखान्यांच्या खासगीकरणावर आक्षेप घेतला होता. शिवाय, कमी किंमतीत कारखाने खरेदी केल्याचा आरोपही केला होता.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे केली होती.

संबंधित बातम्या :


अण्णा हजारेंवर मानहानीचा खटला भरण्याचा विचार : पवार


सहकारी साखर कारखान्यात 25 हजार कोटींचा घोटाळा : अण्णा हजारे