मुंबई : शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेल्या स्पीड बोटीला झालेल्या अपघातानंतर शिवस्मारक प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनायक मेटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विनायक मेटेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.


अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाताना स्पीडबोट खडकावर आपटून अपघात झाला होता. या अपघातात सिद्धेश पवार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. "सिद्धेश पवारच्या मृत्यूसाठी विनायक मेटे यांना जबाबदार धरायला हवं. त्यामुळे विनायक मेटेंवर सदोष मुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच मुख्यमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी राधकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे.


शिवस्मारकाची किंमत तेराशे कोटींनी कमी केली


शिवस्मारकाची किंमत राज्य सरकारने 1326 कोटींनी कमी केल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला. "शिवस्मारकाची आधीची किंमत 3 हजार 826 कोटी होती, मात्र ती नंतर 2500 कोटी करण्यात आली. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला विनायक मेटे, मुख सचिव आणि सुभाष देसाईही उपस्थित होते", अशी माहिती विखे-पाटलांनी दिली.


1326 कोटी कसे कमी केले?


- सर्वेक्षण, पाहणी, चाचणी याची किंमत आधीच 20.56 कोटी होती, ती कमी करून 18.36 कोटी करण्यात आली.
- सागरी कामासाठी 1037 कोटी होते ठरविण्यात आले होते, ते कमी करून 674.68 कोटी करण्यात आले.
- स्मारक आणि पुतळ्याच्या बांधकामासाठी आधीची किंमत होती 967.98 कोटी होती ती 638.04 कोटी करण्यात आली.
- इतर कामांची किंमत 142.4 कोटी म्हणजे निम्म्याहून कमी करण्यात आली.
- ट्रेनिंग आणि पहिल्या वर्षीच्या देखेरेखीसाठीचे 105 कोटी पूर्णतः रद्द करण्यात आले.


संबंधित बातम्या


शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडून तरुणाचा मृत्यू


स्मारकांच्या नावाखाली सरकार लोकांचे जीव धोक्यात घालतंय : राज ठाकरे


शिवस्मारक पायाभरणी बोट दुर्घटना, नियोजनशून्यतेने सिद्धेश पवारचा बळी


एका फोनमुळे मोठी दुर्घटना टळली : जयंत पाटील


शिवस्मारक पायाभरणी : बुडणाऱ्या बोटीवरील तरुणाचा थरारक अनुभव


शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी अपघातग्रस्त स्पीडबोट