मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु असताना पूर्व द्रुतगती मार्गावर कोऱ्या उत्तरपत्रिकांचा खच पडल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील विक्रोळी गोदरेज सिग्नलजवळ या सगळ्या उत्तरपत्रिका पसरलेल्या आहेत.


सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षाकाळात पेपरफुटीच्या घटना राज्याच्या विविध भागातून समोर येत आहेत. पण आता कोऱ्या उत्तरपत्रिकांचा खच मुंबईतल्या मुख्य रस्त्यांवर पसरल्याचे पाहायला मिळत असल्याने, अश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, उत्तरपत्रिका रस्त्यावर पसरल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत या कोऱ्या उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या आहेत. पण त्यांचा कोणीही दुरुपयोग करु शकतो असं मत शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.